(सबका मालिक एक)

!! श्री सच्चिदानंद सदगुरू साईनाथ महाराज कि जय !!

शुक्रवार, ६ एप्रिल, २०१२

sai baba

                                                          " श्री साईबाबा "

साई! म्हणजे " साक्षात ईश्वर " साई हे भक्तांचे कधी ईश्वर , माता , पिता तर कधी मित्र सुद्धा झाले. पण साई हे ह्याही पेक्षा मोठे म्हणजे आपल्या सर्वांचे "गुरु" झाले, कित्येक भक्त स्वताला साईचा शिष्य मानतात आणि आपले साई सुद्धा आपल्यावर एका गुरु प्रमाणे प्रेम करतात. आपल्या प्रत्येक सुख दुखात ते आपल्या बरोबर असतात व आपल्याला मार्गदर्शन करत असतात. परंतु असे मोजकेच भक्त असतात कि जे आपल्या साईच्या मार्गदर्शनाने पुढे जात असतात. आणि आपण जरी त्यांना विसरलो तरी ते आपल्या वर पूर्ण पणे लक्ष ठेवून असतात. साई म्हणतात " तुम्ही कुठेही राहा! काहीही करा! पण एवढे मात्र लक्षात ठेवा तुमच्या इत्यंभूत कामाची माहिती माझ्या पर्यंत पोहचत असते. मी सदैव माझ्या भक्ताच्या हृदयात वास करीत आहे ". साई आपल्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. फक्त त्या भक्ताची भक्ती किती पवित्र आहे ह्यावर हे सर्व अवलंबून असते. साईना द्रव्या पेक्षा भक्ती फार आवडते. आणि भक्ती कशी करावी ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वतः श्री साईबाबा आणि त्यानंतर लक्ष्मीबाई ह्या आहेत. साईची आपल्या गुरूंवर असणारी भक्ती ज्यामुळे साई कडे नवविधा भक्ती होत्या आणि त्याच नंतर त्यांनी आपली भक्त लक्ष्मीबाई हिला दिल्या.
         साई सदैव म्हणत कि मी माझ्या भक्तांचा आधीन आहे. म्हणजेच भक्तांच्या भक्ती च्या आधीन आहेत. आज आपण साईना विविध अशा सुवर्ण अलंकारांनी सजवतो. प्रत्येक भक्त आपल्या क्षमते नुसार बाबांना दान देतो बाबांना एखाद्या गरिबाने दिलेल्या १ रुपया आणि एखाद्या गर्भ श्रीमंत माणसाने दिलेल्या सुवर्ण अलंकार ह्यामध्ये सुधा साम्य आढळते कारण प्रत्येकाने आपल्या  क्षमते नुसार ते साई ना अर्पण केलेले असते, कधी कधी तर भक्ताची भक्ती सुद्धा साईना मौल्यवान वस्तू पेक्षा श्रेठ वाटते. आज शिर्डी संस्थान हे भारतातील दुसरे श्रीमंत देवस्थान आहे. पण आमच्या सारख्या भक्तांसाठी तर ते जगातील पहिले देवस्थान आहे भक्ती साठी. ह्याचे कारण हे एका साई भाक्तालाच विचारा. ( कारण :- साई आणि साईभक्त ह्यांना जोडणारा धागा म्हणजे भक्ती. हि आमच्या गुरूंची ( साईची ) शिकवण आहे )  म्हणून प्रत्येक साईभक्त हेच म्हणेल " सबका मलिक एक! ". साई राम. नमो साईनाथ.

                                                                                                                   धन्यवाद
                                                                                                                आपला साईभक्त
                                                                                                       http://saianubhav.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा